मेहुणीच्या संबंधाला विरोधातून खून : दोघांना अटक


Murder over opposition to sister-in-law’s relationship : Two arrested पुणे (10 मे 2025) : आपल्या मेहुणीचे लग्नानंतरही दुसर्‍याशी असलेले विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण दाजीला लागताच त्याने या संबंधाला विरोध दर्शवला मात्र आरोपीने थेट दाजीचा काटा काढला.

मनोहर दिनकर शिंदे (46, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असे मृताचे नाव असून तो इस्टेट एजंट आहे तर याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (32) आणि केशव मोतीराम असोरे (26, दोघेही रा.खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेहुणीचे आरोपी रोहित असोरे याच्याशी अनैतिक संबंध होते. मनोहर यांनी याला विरोध केला होता. यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. शुक्रवारी रात्री रोहितने त्याचे दोन ते तीन साथीदार घेऊन मनोहर यांना पवारनगर येथे गाठले. ज्ञानदा अपार्टमेंटसमोर त्यांनी मनोहर यांना लाथा-बुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. डोक्यावर गंभीर वार झाल्याने मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन पथके तयार करून पोलिसांनी मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून, तर केशवला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक केली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !