भुसावळ शहरातील प्रौढाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

Adult in Bhusawal city commits suicide by shooting himself in the head न्युज डेस्क । भुसावळ (12 मे 2025) : शहरातील गंगाराम प्लॉट भागातील प्रौढाने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. डिगंबर बढे (52) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
काय घडले नेमके
डिगंबर बढे (55) हे यापूर्वी व्यवसायाने चालक होते व हल्ल्ी शहरातील ट्रॅव्हल्समध्ये वाहनांच्या मेन्टनन्सचे काम पाहत होते. गंगाराम प्लॉट भागातील घरात सोमवारी सकाळी ते घरी एकटे असताना त्यांनी गावठी पिस्तूलातून डोक्यात एक गोळी झाडून आत्महत्या केली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
गंगाराम प्लॉट भागात घडल्या प्रकारानंतर माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली तर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी धाव घेतली.
