प्रतीक्षा संपली ! उद्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार

The wait is over! The results of the 10th exam will be announced tomorrow. मुंबई (12 मे 2025) : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावी परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले होते मात्र या निकालाची प्रतीक्षा आता संपली असून सोमवार, 12 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
एक वाजता जाहीर होणार निकाल
मंगळवार, 13 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष पत्रकार परिषदेत निकालाची औपचारिक घोषणा करतील. त्यानंतर दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लवकर झाल्या त्यामुळे बारावीचा निकालही लवकर लागला होता. आता दहावीचा निकालही लवकर जाहीर होत आहे
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
