सावदा पोलिसांची कामगिरी : कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या गायींची सुटक


Performance of Savda Police: Rescue of cows tied for slaughter सावदा (12 मे 2025) : सावदा पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या दोन गायींची सुटका केली. ही कारवाई सावदा शहरातील ख्वाजानगर परीसरातील निमजाय माता रोडवर करण्यात आली.

गायींची गो शाळेत रवानगी
सावदा शहरातील शेख रसुल शेख चाँद कुरेशी याने कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या दोन गायींची सावदा पोलिसांनी सुटका करीत 60 हजार रुपये किंमतीच्या दोन गायींची जळगावच्या बाफना गो शाळेत रवानगी केली. सावदा पोलीस स्टेशनचे हवालदार निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरुन शेख रसुल शेख चाँद कुरेशी (रा.ख्वाजा नगर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !