14 हजारांची लाच भोवली : पुरवठा अधिकार्‍यासह खाजगी पंटर जाळ्यात


Bribe scam worth Rs 14,000 : Private punter along with supply officer caught in the net ईगतपुरी (14 मे 2025) : 14 हजारांची लाच स्वीकारल्यानंतर उर्वरीत 16 हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी ईगतपुरी येथील पुरवठा अधिकार्‍यासह खाजगी पंटराला अटक करण्यात आली. ललित सुभाष पाटील असे पुरवठा निरीक्षण अधिकार्‍याचे तर सोमनाथ रामकिसन टोचे (35, भरवीर, तालुका इगतपुरी) असे खाजगी पंटराचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
60 वर्षीय तक्रारदार हे त्यांचे गावातील 60 रेशनकार्ड काढून देण्याच्या संदर्भात पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी ललित पाटील व गोसावी यांना भेटले. त्यांनी खाजगी इसम सोमनाथ टोचे यांच्या समक्ष प्रत्येक रेशनकार्डला 500 रुपये प्रमाणे दर ठरवून त्यापूर्वी चार हजार रुपये स्विकारले असून उर्वरित 26 हजार रुपये लाचेची मागणी केली आहे.

3 जानेवारी 25 रोजी तक्रारदाराकडे खाजगी इसम सोमनाथ व ललित पाटील यांनी 26 हजारांची मागणी पंचांसमक्ष केली. तसेच वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील खाजगी इसम सोमनाथ टोचे यांनी इगतपुरी पुरवठा विभागातील ललीत पाटील, पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचेसमक्ष तक्रारदार यांचेकडे 30 हजार लाचेची मागणी करुन त्यापैकी चार हजार रुपये ललित पाटील यांना पोहच झाल्याचे सांगितले व उर्वरीत 26 हजार रुपये लाच 3 जानेवारी 2025 रोजी पंचसाक्षीदारांसमक्ष मागणी करुन सदर रक्कमेपैकी 10 हजार रुपये 3 जानेवारी 2025 रोजी सोमनाथ टोचे याने स्विकारले आहेत.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, हवालदार माळी, हवालदार विनोद चौधरी, विलास निकम, अनिल गांगोडे, चालक हवालदार संतोष गांगुर्डे, हवालदार विनोद पवार, हवालदार परशुराम जाधव आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !