वरणगावात गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह संशयीत जाळ्यात


Suspect caught with village axe and live cartridges in Varangaon वरणगाव (15 मे 2025) : वरणगाव शहरातील एका संशयीताच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नवाब शहा युसूफ शहा (20, प्रतिभा नगर, वरणगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे

गोपनीय माहितीवरून कारवाई
वरणगावचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना संशयीत नवाब शहाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. बुधवार. 14 रोजी दुपारी दोन वाजता फकिरवाडा भागातून संशयीताला दोन जिवंत काडतूस व गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !