अमळनेरात मालगाडीला अपघात : भुसावळ-दादरसह सुरत एक्स्प्रेस रद्द ; सात गाड्यांचे बदलले मार्ग


Goods train accident in Amalner : Bhusawal-Dadar and Surat Express cancelled; Routes of seven trains changed अमळनेर (15 मे 2025) : अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडी घसरल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडल्यानंतर अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसलीतरी भुसावळ-सुरतदरम्यान धावणार्‍या दोन गाड्यांसह भुसावळ-दादर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे तर सात रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

काय घडले अमळनेरात
भुसावळकडून नंदुरबारकडे कोळसा घेवून जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली. या घटनेत रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड पूर्णपणे सुरक्षित आहेत मात्र, मालगाडीचे काही डब्बे रुळावरून खाली उतरल्याने आजूबाजूचे रेल्वे ट्रॅकही खराब झाले. रेल्वे अपघातानंतर सुरत-भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

सात गाड्या बदलले मार्ग
09066 छपरा-सुरत विशेष गाडी ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरतमार्गे वळविण्यात आली आहे.

19046 छपरा-सुरत एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरतमार्गे वळविण्यात आली आहे.

22723 नांदेड-श्री गंगानगर एक्सप्रेस ही जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाडमार्गे वळविण्यात आली आहे.

20934 दानापूर-उधना एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.

06157 चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी विशेष गाडी ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाड मार्गे वळविण्यात आली आहे.

22972 पाटणा-बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, बांद्रा टर्मिनस मार्गे वळविण्यात आली आहे.

20861 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, अहमदाबाद मार्गे वळविण्यात आली आहे.

भुसावळ एक्स्प्रेससह तीन रेल्वे गाड्या रद्द
अमळनेरातील रेल्वे अपघातामुळे गाडी क्रमांक 19004 भुसावळ- दादर एक्सप्रेस, 19006 भुसावळ-सुरत एक्सप्रेस तसेच गाडी 19008 भुसावळ-सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली. ऐनवेळी रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांमुळे सुरत जाणार्‍या प्रवाशांना खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागला मात्र त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागला तर सुरत जाण्याच्या अपेक्षेने रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना गाडी रद्द झाल्याची माहिती मिळताच त्यांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसून आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !