तुमचंही रेशन कार्ड रद्द झाले का ? राज्यातील 18 लाख रेशन कार्ड रद्द : काय घडले नेमके ?
Has your ration card also been cancelled ? 18 lakh ration cards cancelled in the state: What exactly happened? मुंबई (15 मे 2025) : ही बातमी रेशन कार्ड वापरणार्या ग्राहकांसाठी आहे. राज्यभरात तब्बल 18 लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात सरकारी नोकरदार, व्यापारी, श्रीमंतांकडून स्वस्त धान्याचा गैरवापर करण्यात येत असल्याच्या तक्रारीनंतर राज्याच्या पुरवठा विभागाने या संदर्भात कारवाई केली आहे.
काही बांगलादेशी नागरिकांनी काढलेले बोगस रेशनकार्डही रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान राज्यात राबवण्यात येणार्या ई-केवायसी मोहिमेमुळे या अपात्र लाभार्थींवर गंडांतर आले आहे. 5.20 कोटी रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी पूर्ण केली असून 1.65 कोटी कार्डधारकांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ही मोहिम संपली असली, तरी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत केवायसी सुरू राहणार आहे आणि पात्र लाभार्थींना धान्याचा लाभ मिळतच राहणार आहे.
मुंबईत सर्वाधिक रद्द ; ठाणे-पुणे मागेच
राज्यात सर्वाधिक रेशन कार्ड मुंबईत 4.80 लाख, तर ठाण्यात 1.35 लाख रद्द करण्यात आली. पुणे आणि इतर शहरी भागही केवायसीमध्ये मागे असल्याचे चित्र आहे. तुलनेत भंडारा, गोंदिया आणि सातारा हे जिल्हे ई-केवायसीत आघाडीवर आहेत.
ई-केवायसीमुळे अनेक बनावट कागदपत्रांवर मिळालेली कार्डं रद्द झाली, ज्याचा फायदा बांगलादेशी नागरिकांनाही मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


