फैजपूरच्या छळ प्रकरणातील सर्व संशयितांची चार वर्षांनी न्यायालयातून निर्दोष मुक्तता
All suspects in Faizpur torture case acquitted by court after four years यावल (17 मे 2025) : सन 2020 मध्ये तीन लाख रुपये घेऊन पतीकडून घटस्फोट घेण्यात आला मात्र तत्पूर्वी दाखल विवाहितेच्या छळाचा गुन्हा विवाहितेने मागे घेतलाच नाही. चार वर्ष यावल न्यायालयात सदर खटला चालला. यात सर्व संशयीतांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तत्पूर्वी पैसे घेऊनही गुन्हा मागे घेतला नाही म्हणून या गुन्ह्यातील एका 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने देखील मृत्यू झाला होता. अखेर चार वर्षांनी सदर कुटुंब निर्दोष मुक्त झाले.
काय आहे नेमके प्रकरण ?
फैजपूर शहरातील केतन विनोद झांबरे, संगीता विनोद झांबरे (मयत), विनोद काशिनाथ झांबरे, नूतन दुलार उर्फ दीपक भंगाळे, प्रमोद काशिनाथ झांबरे, करुणा प्रमोद झांबरे, नेहा प्रमोद झांबरे, सुनील काशिनाथ झांबरे या आठ जणाविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात भाग्यश्री केतन झांबरे हिने एक लाखासाठी छळ केला व तिच्या मुलीला आणि तिला घरातून हाकलून दिल्याच्या आरोपान्वये गुन्हा दाखल केला होता.

2019 मध्ये हा गुन्हा दाखल केल्यानंतर 2020 मध्ये त्यांनी पती केतन झांबरे याच्यापासून मुलीच्या पालनपोषण सह घटस्फोटा करीता तीन लाख रुपये घेऊन घटस्फोट देखील घेतला मात्र फैजपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा त्यांनी मागे घेतला नाही. हा गुन्हा मागे घेतला नाही म्हणून पैसे देऊनही आपल्याला शिक्षा होईल की काय या भीतीने संशयीत संगीता झांबरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.
दरम्यान चार वर्ष सदर केस यावल न्यायालयात चालली व अॅड.गौरव पाटील यांनी न्यायालयाचे निदर्शनास हा संपूर्ण प्रकार आणून दिल्यानंतर या गुन्ह्यातील सर्व संशयीतांना यावल न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश आर.एस. जगताप यांनी निर्दोष मुक्त केले.
तडजोड करतांना माणुसकी धर्म तरी पाळावा
या संपुर्ण कौटुबीक प्रकरणात एक वर्षानंतर तडजोड करण्यात आली होती मात्र तरीदेखील हा गुन्हा मागे घेण्यात आला नाही. यामुळे चार वर्ष न्यायाची प्रतीक्षा सदर कुटुंबास करावी लागली. तडजोड करतांना किमान माणुसकीधर्म पाळला गेला पाहिजे, असे प्रसंगी वकील गौरव पाटील यांनी सांगितले.




