मुंबईतील ताज हॉटेलसह विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी : ई मेलनंतर वाढवली सुरक्षा
Bomb threat to blow up Mumbai’s Taj Hotel and airport: Security increased after email मुंबई (17 मे 2025) : पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात जोरदार एअरस्ट्राईक केला मात्र त्यानंतर भारताला सातत्याने धमकीचे ई मेल प्राप्त होत आहेत. आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि ताज महल हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. हा धमकीचा ईमेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एअरपोर्ट पोलीस अधिकार्यांना अधिकृत मेलवर पाठवण्यात आला आहे.
बदला घेणार असल्याचा ई मेलमध्ये उल्लेख
दहशतवादी अफजल गुरू आणि सैवक्कू शंकर याच्या फाशीचा बदला घेणारच असं या ईमेलमध्ये म्हटलं आहे. या ईमेलची मुंबईत पोलिसांनी तत्काळ दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. या दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून अद्याप काही संशयास्पद सापडले नाही.
शिपाई महेश कदम हे त्यावेळी ड्युटीवर होते. या ईमेलमध्ये 7 आरडीएक्स बॉम्ब ताज महल हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट परिसरात ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर पोलीस शिपाई कदम यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी व्हटकर यांना माहिती कळवली. त्यानंतर बॉम्बनिरोधी पथकाने एअरपोर्ट टर्मिनल 1, 2, प्रवेश गेट, टॅक्सी स्टँडसह हॉटेल ताज सांताक्रुझ आणि एटीसी टॉवरची तपासणी केली. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ ने दिले आहे,