वढोदे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने 50 वर्षीय प्रौढाचा मृत्यू


50-year-old man dies after being hit by unknown vehicle near Vadode village यावल (17 मे 2025) : यावल तालुक्यातील वढोदे गावाजवळ यावल-चोपडा राज्य महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत 50 वर्षीय अज्ञात प्रौढ जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

काय घडले नेमके
यावल-चोपडा राज्य महामार्गावरील रस्त्यावरील वढोदे गावातील बेहडे कृषी केंद्राजवळ गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या 50 वर्षीय अज्ञात व्यक्तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपूर्वी हा प्रकार उघडकीस आला. अपघाताची घटनेची माहिती यावल पोलिसांना देण्यात आली.





पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीस यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून त्यास मयत घोषीत केले.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालका विरुद्ध मुकुंद बहादुर बारेला (रा.वढोदे, ता.यावल) यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !