मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात नाशिक विभागातून भुसावळ उपअधीक्षक कार्यालय प्रथम


Bhusawal Deputy Superintendent’s Office is the first from Nashik division in the Chief Minister’s 100-day office reform program भुसावळ (17 मे 2025) : मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्यभरातील 358 तालुक्यातील दहा हजार शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगिरी केली. विविध निकषांच्या आधारे गुणानुक्रम ठरवण्यात आले व नाशिक विभागात भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालय प्रथम आले तर द्वितीयस्थानी संगमनेर तर तृतीयस्थानी कळवण आले. भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध उपक्रम राबवल्याने त्याची शासन स्तरावरून दखल घेण्यात आल्यानंतर भुसावळ उपअधीक्ष कार्यालयाने पहिला क्रमांक पटकावला.

अपडेट रेकॉर्ड : पोलिस कर्मचार्‍यांसाठी एम्प्लॉयी ऑफ द मंथ पुरस्कार
नाशिक विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी संवर्गात भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालय प्रथम आले आहे. भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पदभार घेतल्यानंतर कर्मचार्‍यांचा कामाप्रती अधिक उत्साह वाढण्यासाठी ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ ही संकल्पना राबवण्यास सुरूवात केली. दर महिन्याच्या अखेरीस होणार्‍या क्राईम मिटींगमध्ये विभागातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्रासह गौरव केला जातो शिवाय जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते एक हजारांचा रिवॉर्डही या संकल्पनेनुसार कर्मचार्‍यांना दिला जातो. पुरस्कारामुळे कर्मचार्‍यांमुळे कामाप्रती अधिक सांघिक भावना निर्माण होवून अधिक चांगल्या पद्धत्तीने कामकाजाचा परिणाम दिसून आला.





सर्व विभागात अपडेट रेकॉर्ड
भुसावळ पोलीस उपअधीक्षक पिंगळे भुसावळ विभागात येणार्‍या सर्व पोलीस ठाण्याचे रेकॉर्ड अद्यावत केले. त्यांच्या या कार्याची दखल नाशिक विशेष महानिरीक्षकांनी घेत त्यांच्या संकल्पनेचे कौतुक करीत अद्यापत रेकॉर्ड ठेवण्याची विशेष शैलीसह कर्मचार्‍यांचा हुरूप वाढवण्यासाठी सुरू केलेल्या ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराची अंमलबजावणी आपापल्या स्तरावर राबवण्याचे निर्देशही दिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !