निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई : गावठी दोन पिस्तुलांसह संशयीत जाळ्यात
Nimbhora police take major action : Villager nabbed with two pistols, suspect निंभोरा, ता.रावेर (19 मे 2025) : निंभोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावातील संशयीताकडून दोन गावठी पिस्टल जप्त केल्याने गावात खळबळ उडाली आहे. अनिल रामलाल बारेला (खिर्डी, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे
गोपनीय माहितीवरून कारवाई
खिर्डी खुर्द शिवारातील निळकंठ पुंडलिक बढे यांच्या शेत गट क्रमांक 349 मध्ये एका घराशेजारी संशयीत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती निंभोर्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले.

रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पथकाने धाव घेत संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अनिल रामलाल बारेला (खिर्डी, ता.रावेर) नाव सांगितले तर अंग झडतीत दोन पिस्टल निघाल्याने ते जप्त करण्यात आले. आरोपीविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




