कार शंभर फुटावरून कोसळल्याने पाच जण ठार


Five killed as car falls 100 feet खेड (19 मे 2025) : मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटूंबियांची कार शंभर फुट खोल कोसळल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले तर कार चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथे जगबुडी नदीच्या पुलावर आज पहाटे घडला.

मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19), श्रेयस राजेंद्र सावंत (23) या पाच जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे.

दोन्ही कुटुंबे मुंबई मिरा रोड भाईंदर येथून रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास देवरूख येथे जात होते. भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली. ही भीषण दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे पाच ते साडेपाच सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात आणले. मात्र या अपघातातील पाच जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला.

या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हालवण्यात आले आहे तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवण्यात आल आहे. पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत तर मोरे मीरा-भाईंदर येथील आहेत.

घटनास्थळी मदतीकरता खेड येथील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह नागरिक, पोलिसांनी व महामार्ग पोलिसांनी धाव घेतली होती तातडीने कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !