यावलनजीक भीषण अपघात : कोरपावलीतील काकूसह पुतण्या ठार

यावल तालुका कृषी कार्यालयासमोर दुचाकीला स्कूल बस धडकली


Terrible accident near Yaval : Aunt and nephew from Korpavali killed यावल (20 मे 2025) : यावल तालुक्यातील कोरपावली येथून 17 वर्षीय पुतण्या तिच्या काकूला घेऊन यावल बस स्थानकावर पुणे जाण्यासाठी सोडण्यासाठी येत असताना यावल तालुका कृषी कार्यालयासमोर स्कूल बसने दुचाकीला धडक दिल्याने 17 वर्षीय पुतण्या व 20 वर्षीय काकू ठार झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे 6.45 वाजेच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात स्कूल बस चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले यावल शहरात
कोरपावली, ता.यावल येथील रहिवासी विशाल कुशल येवले (17) हा युवक मंगळवारी पहाटे त्याची काकू निशा जितेंद्र येवले (20) यांना पुण्याला जायचं असल्याने त्यांना दुचाकी (क्रमांक एम. पी. 07 एन. पी. 3072) द्वारे यावल बसस्थानकावर सोडण्यासाठी येत असताना यावल शहराबाहेरच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर स्कूल बस (क्रमांक एम.एच. 19 वाय. 7198) ने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये विशाल येवले व निशा येवले दोघे जागीच ठार झाले.


नागरिकांची धाव
अपघाताची माहिती नागरिकांनी यावल पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार योगेश गोसावी, रोहील गणेश, निलेश चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले. रवी भालेराव, उमेश जावळे यांच्या मदतीने मृतदेह तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.अपघाताची माहिती कोरपावली गावात मिळताच कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल तसेच गावातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली.

अपघात प्रकरणी कुशल पांडुरंग येवले यांच्या फिर्यादीवरून स्कूल बस वरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !