नातवासोबत दहावीचे मार्कशीट आणणार्‍या आडगावच्या आजोबांचा अपघाती मृत्यू तर नातू गंभीर

मंगळवार अपघातवार : 16 वर्षीय अल्पवयीन गंभीर जखमी


Adgaon grandfather who brought 10th grade marksheet with grandson dies in accident, grandson critical यावल (20 मे 2025) : यावल तालुक्यातील आडगाव येथून 16 वर्षीय नातवासोबत 70 वर्षीय वृद्ध आजोबा चिंचोली येथे इयत्ता दहावीचे मार्कशीट घेण्यासाठी दुचाकीवर जात असताना दुचाकीला चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्याजवळ पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये आजोबा जागीच ठार झाले तर नातू हा गंभीर जखमी झाला.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातवाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


काय घडले नेमके ?
आडगाव, ता.यावल येथील रहिवाशी सुभाष बाबुराव पाटील (70) हे दुचाकी (क्रमांक एम.एच. 04 बी. एक्स. 4568) द्वारे आपल्या सोबत नातू कल्पेश उत्तम पाटील (16) याला घेऊन चिंचोली येथील विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आणि मार्कशीट घेण्यासाठी जात होते. चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यापासून काही अंतरावर त्यांच्या दुजाकीला पीकअप वाहन (क्रमांक एम. एच. 04 के.एफ. 8440) वरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये सुभाष पाटील हे जागीच ठार झाले तर कल्पेश पाटील याला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक मकसूद शेख, हवालदार संदीप सूर्यवंशी हे पथकासह दाखल झाले. तत्पुर्वी जखमी अवस्थेतील कल्पेश पाटील याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले तर मयत सुभाष पाटील यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वासुदेव बाबुराव पाटील यांच्या फिर्यादीवरून पिकअप वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मक्सुद शेख, हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !