भुसावळातील तापी नदीपात्रात बुडून जालन्याच्या मामा-भाच्याचा मृत्यू
Jalna’s maternal uncle and nephew drown in Tapi riverbed in Bhusawal भुसावळ (21 मे 2025) : भुसावळातील नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आलेल्या जालन्यातील मामा-भाच्याचा तापी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहुल नगराकडील घाटावर घडली.
रामराजे नंदलाल नाटेकर (47, मामा चौक, जालना) व त्यांचा भाचा आर्यन नितीन काळे (18, जालना) अशी मृतांची नावे आहे. या घटनेने भुसावळातील नातेवाईकांना मोठा धक्का बसला व त्यांनी मृतदेह पाहताच आक्रोश केला.
काय घडले भुसावळात
शहरातील मामाजी टॉकीज परिसरातील रहिवासी संदीप पेंढारकर यांच्याकडे पूजा-विधीच्या कार्यक्रमासाठी नाटेकर व काळे हे मामा-भाचे आले होते. बुधवारी सकाळी पोहण्यासाठी ते राहुल नगर परिसरातील तापी पात्रात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. शहर पोलिसांना माहिती कळताच त्यांनी धाव घेतली व मृतदेह ट्रामा सेंटरमध्ये हलवले.