धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी भाग्यश्री विसपुते : राज्यातील आठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या


Bhagyashree Vispute appointed as Dhule District Collector : Eight IAS officers transferred in the state मुंबई (21 मे 2025) : राज्यातील आठ आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. धुळ्याचे जिल्हाधिकारी जे.एस.पापळकर यांची छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भाग्यश्री विसपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर गेलेले नवल किशोर राम यांची बदली पुन्हा एकदा पुण्यात करण्यात आली असून त्यांच्याकडे आता पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला.

सी.के.डांगे यांच्याकडे आता सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव कार्यालयाच्या सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बदली बृहन्मुंबई जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे तर अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी आशिष येरेकर यांची बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकार्‍यांचे नाव व बदलीचे ठिकाण

नवल किशोर राम : आयुक्त, पुणे महानगरपालिका

शीतल तेली-उगले : क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे

जे.एस. पापळकर : विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर

सी.के. डांगे : सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग

सौरभ कटियार : जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा

भाग्यश्री विसपुते : जिल्हाधिकारी, धुळे

आनंद भंडारी : मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद

आशिष येरेकर : जिल्हाधिकारी, अमरावती


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !