भुसावळात रेल्वे तिकीटाची दलाली : संशयीत सुरक्षा बलाच्या जाळ्यात


Railway ticket brokering in Bhusawal: Suspect caught by security forces भुसावळ (21 मे 2025) : रेल्वे तिकीटाची दलाली करणार्‍या संशयीताला भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. मोहम्मद युसुफ मोहम्मद इल्यास खाटीक (44, हबीब मंजिल, मिल्लत नगर, पप्पू किराना दुकानाजवळ, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ स्थानक निरीक्षक पी.आर.मीना यांच्या मर्गदर्शनाखाली उप निरीक्षक सुदामा यादव ,प्रधान आरक्षक नीलेश अढ़वाल, आरक्षक विलाश बोरोले गस्तीवर असताना संशयीत मोहम्मद युसूफ यास रेल्वे आरक्षण तिकीट काढताना ताब्यात घेण्यात आले. 20 मे रोजी ही कारवाई करण्यात आली. संशयीताकडे 21 रोजीचे ट्रेन 12715 सचखण्ड एक्स्प्रेसचे भुसावळ-नवी दिल्लीचे आरक्षण पत्र मिळाले व त्याबदल्यात त्याला तिकीटाच्या रकमे व्यतिरीक्त दोनशे रुपये कमिशन मिळाल्याचे त्याने मान्य केले. संबंधिताकडे याबाबतचे लायसन्स नसल्याने पंच बोलावून रेल्वे अ‍ॅक्ट 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !