फैजपूर विभागातील चौघा कर्मचार्यांचा ‘टॉप स्कॉप ऑफ द मंथ’ म्हणून गौरव
पुरस्काराने कर्मचार्यांचा वाढला हुरूप
पोलीस ठाण्याचे कामकाज जलद गतीने आणि चांगले व्हावे व चांगल्या काम करणार्या पोलीस कर्मचार्यांचे कौतुक केले जावे या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यावतीने डी वाय एस पी कार्यालया अंतर्गत पोलीस स्टेशन ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अंमलदार यांना एक हजार रुपयांचे रोख स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाते.
या कर्मचार्यांचा गौरव
या महिन्यात रावेर पोलीस ठाण्याचे हवलदार प्रमोद सुभाष पाटील यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोरसिंग नारायणसिंग परदेशी यांची, निंभोरा पोलीस ठाण्याचे रशीद तुराब तडवी यांची तर फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विजय हेमराज चौधरी यांची पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली. व त्यांना डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देत व प्रोत्साहन पर बक्षीस देत सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महिन्यात उत्कृष्ट काम करणार्या या चार पोलीस ठाण्याच्या चार कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.