भुसावळात ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ शिवसेनेतर्फे निघाली विजयी तिरंगा रॅली


Shiv Sena takes out victorious tricolor rally in Bhusawal in honor of Operation Sindoor भुसावळ (23 मे 2025) : भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूर या दहशतवादविरोधी मोहिमेच्या सन्मानार्थ येथे शिवसेना (शिंदे गट)तर्फे विजयी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. महिला जिल्हा प्रमुख नंदाताई प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून दुपारी काढली होती.

पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि जिल्हाप्रमुख समाधान महाजन व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत भुसावळ शहरप्रमुख पवन नाले, तालुकाप्रमुख वर्षा तल्लारे, सविता माळी, मनीषा पाटील, स्वाती भंगाळे यांच्यासह अनेक महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. देशभक्तीवर घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !