मुक्ताईनगर तालुका शिवसेना उपप्रमुखासह दोघे अपघातात ठार
Muktainagar taluka Shiv Sena deputy chief along with two killed in accident मुक्ताईनगर (24 मे 2025) : भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने नायगाव येथील भागवत महारू कोळी व पुंडलिक रामकृष्ण कोळी यांचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री घडला. मुक्ताईनगर पोलिसात लखन मोरे (लोहारखेडा) यांनी खबरीनुसार अपघाताची नोंद करण्यात आली.
काय घडले नेमके
मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ पांढर्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप (एम.पी.09 डी.एस.6687) ने दुचाकी (एम.एच.19 बी.ए.0356) ला दिलेल्या धडकेत नायगाव येथील पुंडलिक रामकृष्ण कोळी (वय 54) व भागवत महारु कोळी (62) या दोघांचा मृत्यू झाला. भागवत कोळी हे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख होते.








