गाईचा आरोग्यासाठी सर्वांगीण फायदा म्हणूनच ती गो माता

हरीप्रकाश गोशाळा शेड लोकार्पण प्रसंगी सुनील सूर्यवंशी


Cows are known as Go Mata because of their overall health benefits भुसावळ (25 मे 2025) : साकेगाव येथील श्री स्वामीनारायण ट्रस्टच्या हरीप्रकाश गोशाळेच्या शेडचे लोकार्पण वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प.पू.के.के.शास्त्री, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे सदस्य सुनील सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पशुसंवर्धन सह आयुक्त खाचणे, प.पू.पी.पी.शास्त्री, धर्मस्वरूप शास्त्री, नायब तहसीलदार संतोष विनंते, विष्णू शास्त्री व ईश्वरदास शास्त्री उपस्थित होते.

गायीचा सांभाळ प्रत्येकाला शक्य नसल्यानेच गो शाळेची निर्मिती
सुनील सुर्यवंशी यांनी गायीचे दूध, गोमूत्र, शेण आदी घटकांचा आरोग्यासाठी कसा उपयोग होतो याचे महत्त्व सांगितले. यावेळी पी.पी.शास्त्री, उमेश नेमाडे, ईश्वरदास शास्त्री यांनी आपल्या मनोगतात गायींची महती सांगून प्रत्येक जण गाय दारी सांभाळू शकत नसल्याने गोशाळा निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांची सेवा करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक गणेश फेगडे यांनी तर सूत्रसंचलन जळगांव स्वामीनारायण मंदिराचे नयनस्वामी यांनी तर आभार मनोज भोसले यांनी मानले.

यशस्वीतेसाठी गोपाळ भगत, प.पू.राधास्वामी व श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या सर्व कर्मचार्‍यांनी सहभाग येईल कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातून विविध संत मंडळी व गो सेवक तसेच नागरिक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !