शेतकर्यांना मोठा दिलासा : तुर खरेदीसाठी आता या तारखेपर्यंत मुदतवाढ !
जळगाव (26 मे 2025) : खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीवर सुरू असलेल्या तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही खरेदी आता 28 मेपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील 16 खरेदी केंद्रांवर शेतकर्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी सादर करता येणार आहे.
7550 दर निश्चित
नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात म्हसावद, जळगाव, अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव येथे ही खरेदी सुरू आहे. आधारभूत किंमतप्रमाणे तुर खरेदीचा दर 7550 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.
मुदतवाढीचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांनी केले असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस.एस.मोने यांनी केले आहे.