भुसावळातील मनसेच्या पदाधिकार्यांना पोलिसांना बजावल्या नोटीसा

भुसावळ : महाजनादेश यात्रेनिमित्त शहरात शुक्रवारी दुपारी शहरात येत असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून दाखविणार असल्याने पोलिस प्रशासनाकडून मनसेचे पदाधिकारी विनोद पाठक, लीना साळवी, डॉ. उमेश सपकाळे, मधुकर कोळी यांच्यासह अन्य पदाधिकार्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहे. प्रसंगी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचेही संकेत पोलिसांनी दिले आहे. मुख्यमंत्री यांच्या दौर्याच्या पार्श्वभुमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षकांकडून पाहाणी
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी गुरुवारी कार्यक्रमस्थळी भेट देऊन पहाणी केली. यावेळी मुख्यमंत्री यांच्या दौर्यांची रंगीत तालीमही करण्यात आली. दरम्यान, सभा मंडपात आठ हजार नागरीक बसतील असा वॉटर प्रुफ मंडप टाकण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होत आहे.
