पाचोर्‍याचे माजी आमदार दिलीप वाघ भाजपाच्या गळाला : आज मुंबईत पक्ष प्रवेश !


Former MLA from Pachorya Dilip Wagh joins BJP : Joins the party in Mumbai today! पाचोरा (27 मे 2025) : पाचोरा शहरातील माजी आमदार दिलीप वाघ हे कार्यकर्त्यांसह मंगळवार, 27 रोजी भाजपात प्रवेश करीत आहेत.

मध्यंतरी अजित पवार गटाला हुलकावणी देणारे दिलीप वाघ शेवटी भाजपच्या गळाला लागले असून उद्धवसेनेलाही मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील काही बड्या चेहर्‍यांना आपल्या गळाला लावून महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह काही प्रमुख पदाधिकार्‍यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यावेळेसही माजी आमदार दिलीप वाघ हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी वाघ यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय बदलला होता.

शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान समजले जाणारे माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांचे दोन्ही मुलं (रोहन व पराग मोरे) देखील मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यासह उद्धवसेनेचे जि.प.चे माजी सदस्य नाना महाजन हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलीप वाघ यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांचा पक्षप्रवेश मंगळवारी मुंबईला होण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !