सहा कोटींचा दरोडा टाकणार्‍या दरोडेखोराचा संभाजीनगरात एन्काउंटर


Encounter in Sambhajinagar of a robber who robbed Rs. 6 crores छत्रपती संभाजीनगर (27 मे 2025) : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून तब्बल सहा कोटींचा ऐवज लुटणार्‍या मुख्य दरोडेखोराचा इन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अमोल खोतकर असे मृताचे नाव असून ही घटना वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये रात्री घडली.

गोळीबारात झाला मृत्यू
छत्रपती संभाजीनगर मधील बजाज नगर परिसरात राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. यात सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले होते मात्र गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अद्यापही पसार होता. त्यालाच ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळत कारवाई सुरू केली होती. यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकर हा सोमवारी रात्री पोलिसांना सापडला. मात्र त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या दिशेने गोळी चालवली. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबार त्याचा मृत्यू झाला.




असा टाकला दरोडा
उद्योजक संतोष लड्डा हे औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर भागात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरात गुरुवार, 15 मे रोजी मध्यरात्री दोन वाजेदरम्यान सहा दरोडेखोर स्विफ्ट डिझायर कारने दाखल झाले. अगदी पाच मिनिटांत ते घरात शिरले. आधी कंपाउंड वॉल ओलांडत नंतर शिडीने छत गाठले अन् मग बेडरूममध्ये शिरले. 1 वाजून 58 मिनिटांनी सुरू झालेला हा दरोड्याचा थरार तब्बल दोन तास सुरू होता. या दोन तासांत चोरट्यांनी 5 किलो 500 ग्रॅम सोने आणि 32 किलो चांदी लंपास केला होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !