धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात सहा ठार

Six killed in horrific accident on Dhule-Solapur highway बीड (27 मे 2025) : अपघातग्रस्त वाहन डिव्हाईडरवरून बाहेर काढत असताना भरधाव कंटेनरने धडक दिल्याने सहा जण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जवळ गढी पुलावर मध्यरात्री घडला.
बाळु आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर, सचिन नन्नवरे यांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे


गेवराई शहराजवळ असणार्या गढी पुलावर एक एसयूव्ही वाहनाचा डीव्हाईडरला धडक बसल्याने किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र गाडी डिव्हायडरवर अडकली होती. ती गाडी बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असताना महामार्गावरून भरधाव जाणार्या ट्रकने सात जणांना जोरात धडक दिली. यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यातील सहा जण हे गेवराई परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
