प्रवासी सुविधांमध्ये सुधारणांवर चर्चा

भुसावळ, नागपूर विभागातील खासदारांची नागपूरात बैठक


Discussion on improvements in passenger facilities भुसावळ (27 मे 2025) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे समाधान कॉन्फरन्स हॉलमध्ये नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध रेल्वे प्रकल्पांची माहिती देण्यात आली, तसेच प्रवासी सुविधांबाबत खासदारांनी यावेळी सूचनाही मांडल्या.

या बैठकीत खासदार डॉ. शोभा बच्छाव (धुळे), राजाभाऊ वाजे (नाशिक), भास्कर भागरे (दिंडोरी), बळवंत वानखेडे (अमरावती), बंटी साहू (छिंदवाडा), श्यामकुमार बर्वे (रामटेक), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), दर्शनसिंह चौधरी (होशंगाबाद), अमर काळे (वर्धा) आणि अनुप धोत्रे (अकोला) सहभागी झाले होते.




बैठकीची सुरुवात महाव्यवस्थापक मीणा यांनी खासदारांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करत केली. त्यांनी मध्य रेल्वेच्या यशस्वी प्रकल्पांची माहिती दिली आणि जी. बी. पंत शील्डसह नवोन्मेष पुरस्कारांचा उल्लेख केला. बैठकीचे सूत्रसंचालन उपायुक्त महाव्यवस्थापक के. के. मिश्रा यांनी केले. नागपूरचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग आणि भुसावळच्या डीआरएम इति पांडे यांनी विभागीय यशोगाथांची सविस्तर माहिती सादर केली.

खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे सुविधा, स्थानक सुधारणा, नवीन गाड्यांची मागणी, वंदे भारत व अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंमलबजावणीबाबत सुचना दिल्या.

या बैठकीला जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदार स्मिता वाघ, केद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती नव्हती. बैठकीत उपस्थित सदस्यांनी सर्वानुमते अनुप धोत्रे यांची समिती अध्यक्षपदी निवड केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !