सिद्धांत शिरसाटांवर आरोप करणार्या महिलेचा ‘यु टर्न’ : सर्व आरोपातून माघार

‘U-turn’ of woman who accused Siddhant Shirsat: Withdrawal from all allegations मुंबई (27 मे 2025) : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी एका महिलेशी संबंध ठेवत तिचा गर्भपात केल्याचा दावा विवाहितेने केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती मात्र आरोप करणार्या महिलेने आता सर्व आरोपातून माघार घेतली आहे.
महिलेने हे प्रकरण घरघुती असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असे सांगत या प्रकरणाला मी फुल स्टॉप देत असल्याचे म्हटले आहे व माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन कुणीही राजकारण करू नये, असेदेखील म्हटले आहे.


सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा या महिलेने दिला आहे.
सिद्धार्थ शिरसाटांवर या विवाहित महिलेकडून मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंद्धांत आणि या महिलेची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध निर्माण झाले. चेम्बूर येथील फ्लॅटवर वारंवार दोघांमध्ये भेटी होत असत. 14 जानेवारी 2022 रोजी या सिद्धांत आणि आपला बौद्ध पद्धतीने लग्न झाल्याचा दावा या महिलेने केला होता. तसेच त्याचे पुरावे असल्याचा दावाही तिने केला होता.
लग्नानंतर सिद्धार्थच्या स्वभावात बदल झाला सिद्धार्थकडून नंतर या महिलेचा जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याची माहिती या महिलेने दिली होती. या महिलेला चेम्बूरच्या फ्लॅटमध्ये राहण्याची जबरदस्ती केली आणि संभाजीनगरात येण्यास मज्जाव करण्यात आला.
सिद्धार्थचे आधीचे विवाह संबंध, इतर महिलांसोबतचे संबंध उघडकीस आल्यानंतर 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पण संजय शिरसाट यांनी राजकीय वजन वापरून हे प्रकरण दाबलं असल्याचा आरोप या महिलेने केला मात्र महिलेने सर्व आरोपातून माघार घेतल्याने प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.
