22 व्या मजल्यावरून उडी घेताच तरुणीच्या शरीराचे झाले दोन तुकडे

The young woman’s body broke into two pieces after jumping from the 22nd floor. मुंबई (28 मे 2025) : 22व्या मजल्यावरून उडी मारून 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. या घटनेत तरुणीच्या शरीराचे खाली पडताच दोन तुकडे झाले.
विक्रोळीतील कन्नमवारनगरमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. हर्षदा तांदोलकर असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

25 वर्षीय हर्षदाने 22व्या मजल्यावरील टेरेसावरून खाली उडी मारली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडवणारे होते.
कन्नमवार नगरमधील इमारत क्रमांक 97 मध्ये ही घटना घडली. इतक्या उंचीवरून उडी मारून आत्महत्या केल्यामुळे खाली पडल्यानंतर तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. रक्ताचा सडा पडला होता. तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला होता.
परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेचा पंचनामा करण्यात आला
एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, हर्षदा तांदोलकर तणावाखाली होती. पण, तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप कळालेले नाही.
