भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात आज ‘वाटा शिक्षणाच्या’ पुरवणीचा प्रकाशन सोहळा

भुसावळ (29 मे 2025) : भुसावळ शहरातील ‘सर्वात वेगवान सर्वात विश्वसनीय’ असलेल्या ’ब्रेकिंग महाराष्ट्र’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून खाजगी वितरणासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘वाटा शिक्षणाच्या’ या शैक्षणिक विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते शहरातील प्रथितयश पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाच्या संगणक हॉलमध्ये गुरुवार, 29 मे रोजी सकाळी 10.30 वाजता होत आहे.
या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेशभाऊ फालक असतील. कार्यक्रमास भुसावळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकीताई पाटील, जळगावच्या लाईव्ह ट्रेंड न्यूजचे संपादक शेखर पाटील (संपादक लाईव्ह ट्रेंड न्यूज), भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई संजय सावकारे, महिला समुपदेशक आरतीताई चौधरी, द वर्ल्ड स्कूलचे अध्यक्ष निशिकांत कोलते, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.