सोलापूर-गोवा विमान सेवेला 9 जूनपासून प्रारंभ

सोलापूर (29 मे 2025) : सोलापूर ते गोवा विमान सेवेला 9 जून पासून प्रारंभ होत असून तिकीट बुकींग सुरू करण्यात आले आहे.
सोलापूर ते गोवा 3491 असे तिकीट असणार असून, 9 जून रोजी पहिले प्रवासी विमान सोलापूरच्या विमानतळावरून उड्डाण करणार आहे. सकाळी 8.50 ला गोव्यातून हे विमान सोलापुरात येणार आहे तर सोलापुरातून सकाळी 10.05 वाजता विमान गोव्याकडे उड्डाण होणार आहे.

विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापुरातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विमानसेवेमुळे सोलापूरच्या उद्योग, धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
सोलापूरकरांनी तत्काळ आपल्या तिकिटांची नोंदणी करून या ऐतिहासिक उड्डाणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आता सोशल मिडियाच्यामाध्यमातून अनेक संस्था, संघटना व लोकप्रतिनिधींनी केले आहे. ही केवळ एक सेवा नाही, तर सोलापूरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. बुकिंगसाठी फ्लाय 91 च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या प्रवासाची तयारी करा असेही म्हटले आहे.
