भुसावळात डिजिटल मिडीया सर्वाधिक चांगला विकसीत : शेखर पाटील

Digital media is most well developed in Bhusawal: Shekhar Patil भुसावळ (29 मे 2025) : शहरातील नाहाटा महाविद्यालयात आपले पाच वर्ष शिक्षण झाले व ज्या वर्गात शिक्षण घेतले त्याच वर्गात प्रमुख अतिथी म्हणून बोलण्याची संधी मिळाल्याचा आनंद अलौकीक आहे. बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारत मी प्रिंटमधून डिजिटल मिडीयात पदार्पण करीत मार्गक्रमण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात डिजिटल मिडीया विकसीत झाला असलातरी तो भुसावळातील सर्वाधिक विकसीत झाला असल्याचा आशावाद लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील यांनी व्यक्त केला. भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या न्युज पोर्टलने प्रकाशित केलेल्या ‘वाटा शिक्षणाच्या’ या पुरवणीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील म्हणाले की, अनेक पत्रकार मला फालो करतात व मला फालो करणार्यांमध्ये भुसावळचे पत्रकार गणेश वाघ यांचादेखील समावेश आहे.

विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देणे आता काळाची गरज आहे. आता स्टोरी टेलिंगचा फार्म्युला आला असून बदलत्या काळानुसार पत्रकारांनीदेखील अपडेट होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मी जळगावकर असलोतरी प्राऊड भुसावळकर असल्याचे ते म्हणाले.
यांची प्रमुख उपस्थिती
विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व ताप्तीचे चेअरमन महेशभाऊ फालक, भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकीताई पाटील, जळगावातील लाईव्ह ट्रेंड न्यूजचे संपादक शेखर पाटील (संपादक लाईव्ह ट्रेंड न्यूज), भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई संजय सावकारे, महिला समुपदेशक आरतीताई चौधरी आदींची उपस्थिती होती.
जाहिरातदारांसह मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
द वर्ल्ड स्कूलचे संचालक व सी.ए.रोहित कोलते, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी.फालक, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल, वेलनेस फाउंडेशनचे निलेश गोरे, अॅड.निर्मल दायमा, चेतन जैन, मयूर अंजाळेकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पर्यावरण तज्ज्ञ नाना पाटील यांनी केले तर आभार ब्रेकींगचे कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी मानले.
