भुसावळातील गंगाराम प्लॉटमधील रस्त्यांचे 30 वर्षांनी उजळले भाग्य !

पावसाळ्यापूर्वी दिलासा, वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


The roads in Gangaram Plot in Bhusawal have brightened up after 30 years! भुसावळ (30 मे 2025) : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील गंगाराम प्लॉट भागातील नमस्कार मंडळाच्या परिसरातील पाच रस्त्यांचे तब्बल 30 वर्षांनी काँक्रीटीकरण करण्यात आले. या परिसरातील रस्ते चकाचक झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
शहरातील प्रभाग क्रमांक 18 च्या माजी नगरसेविका मिनाक्षी धांडे, माजी नगरसेवक नितीन धांडे यांच्या पाठपुराव्याने मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाला मंजूरी मिळाली होती. गंगाराम प्लॉट भागातील बहूतांश सर्वच रस्ते दुर्लक्षीत होते. मात्र भागातील पाच रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामासाठी निधी मंजूर होऊन काम पूर्ण झाले, पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची स्थिती सुधारल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान या कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, मिनाक्षी धांडे, नितीन धांडे, युवराज लोणारी, निर्मल कोठारी, देवेंद्र वाणी आदींसह सर्व नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

पथदिव्यांमुळे झळाळी
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रखर प्रकार देणारे पथदिवे बसविण्यात आले आहे. यामुळे या भागाला झकाळी आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय व नेहमी दिवे बंद राहत असलेल्या या रस्त्याचे भाग्यच उजळल्याच्या भावनाही नागरिकांनी व्यक्त केल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !