वैष्णवी हगवणे प्रकरण : नेपाळ बॉर्डरवर निलेश चव्हाणला पकडले
पुणे (30 मे 2025) : राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अँटी गुंडा स्क्वॉड आणि पुणे क्राइम ब्रांच यांनी संयुक्तपणे कारवाई करत निलेशला थेट नेपाळ बॉर्डरवरून अटक केली.
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यानंतर तो पोलिसांना शरण येण्याऐवजी पसार झाला होता. फरार झाल्यानंतर 21 मे रोजी निलेश चव्हाण पुणे आणि महाराष्ट्रातून बाहेर गेला अखेर 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या बाळाचा ताबा निलेशकडे होता मात्र बाळाचा ताबा मागण्यासाठी वैष्णवीच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे मागणी केली असता, निलेशने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना हुसकावून लावले होते. अखेर, माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर पोलिसांनी आरोपी निलेशवर देखील गुन्हा दाखल केला आहे.
निलेश चव्हाणने पुणे, मुंबई, कर्जत, रायगड असा प्रवास केला, रायगडनंतर त्याने 21 मे रोजी महाराष्ट्राबाहेर म्हणजेच दिल्ली गाठली होती. 25 मे रोजी त्याने दिल्ली ते गोरखपूर प्रवास केला. त्यानंतर, सोनोली (उत्तरप्रदेश), भैरवा (नेपाळ) आणि काठमांडू येथे पोहोचला. नेपाळमधून भैरवा मार्गे सोनोलीमध्ये आल्यावर निलेश चव्हाणला अटक करण्यात आली. आहे. विशेष म्हणजे निलेश चव्हाण हा 25 मे रोजीच्या दुपारपासून 30 मे पर्यंत नेपाळमध्येच मुक्कामी होता.