भुसावळात अटल प्रतिष्ठानतर्फे 7 रोजी रक्तदान शिबिर


भुसावळ (31 मे 2025) : शहरातील अटल प्रतिष्ठानच्या वतीने इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगावमार्फत अटल निवास, शांतीनगर भुसावळ येथे शनिवार, 7 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदान करावे व समाजकार्यास, राष्ट्रकार्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्तदान करू इच्छिणार्‍या दात्यांनी आपली नावे व मोबाईल क्रमांक 98232-88689 या क्रमांकावर पाठवावीत, असे आवाहन आयोजक प्रा.सुनील नेवे यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !