कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रकाश सरदार


Prakash Sardar appointed as Jalgaon District President of Koregaon Bhima Jayastambha Rescue Committee भुसावळ (31 मे 2025) : भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी जळगाव जिल्हाध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रकाश सरदार यांची नियुक्ती केली आहे.

लढ्यात सहभागाचे आवाहन
दादाभाऊ अभंग यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले. भीमा विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामूहिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची निवड
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या जबाबदारी जळगाव जिल्हा नवयुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश यशवंत सरदार यांची नियुक्ती केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश सरदार हे आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. प्रकाश सरदार हे वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत शिवाय जिजल्हा संघटक व केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा व केंद्रीय सचिव आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम इत्यादी पदांवर कार्यरत आहेत. ते भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही दिवसांपासून सक्रिय सहभागी आहेत.

प्रकाश यशवंत सरदार यांच्या नियुक्तीबद्दल समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग, संपादक उत्तम वानखेडे, दिनेश ईखारे, विनोद सोनवणे, पत्रकार प्रकाश तायडे, सुमित निकम, बाळू शिरतुरे, राहुल गाढे, संतोष कसोदे , राजेश तायडे, फेकरी गावचे माजी सरपंच राहुल वाघ आदींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !