जळगाव जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका लढवणार : जगन सोनवणे
Will contest all upcoming elections in Jalgaon district : Jagan Sonawane भुसावळ (31 मे 2025) : भुसावळ शहरात ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध 10 संघटनांची महत्वपुर्ण बैठक आणि पत्रकार परिषद संविधान भवन भीमालय या ठिकाणी झाली. यावेळी संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते जगन सोनवणे यांनी सर्व निवडणुका लढवण्याची घोषणा केली.
आघाडी बनवून निवडणुका लढणार
कामगार नेते जगन सोनवणे म्हणाले की, गटतट विरहीत सर्व संविधानवादी व आंबेडकरवादी संघटनांची आघाडी बनवून जळगाव जिल्ह्यातील सर्व निवडणुका नगरपालिका, पं.स., जि.प., आणि भुसावळ नगरपालिका आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका स्वबळावर आघाडी बनवुन लढविल्या जातील. युतीमुळे व गटा तटा मुळे आंबेडकरवादी व संविधानवादी शक्ती दिसत नाही त्यामुळे आपल्या पायावर चळवळी आणि शक्ती उभी राहीली पाहिजे म्हणुन आमचा नगराध्यक्ष आमचे नगरसवेक निवडून आणण्याचा या मागे आमचा उद्देश असणार आहे. संविधानवादी, आंबेडकरवादी व दलित, मुस्लिम वर्गाला देखील या आघाडीत समाऊन घेऊ.
यांची होती उपस्थिती
यावेळी संविधान आर्मी संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे, विनोद सोनवणे, राकेश बग्गन, हरिष सुरवाडे, आरिफ शेख, गोपी साळी, सचिन बार्हे, दीपक निकमसह जिल्ह्यातील व भुसावळ शहरातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.