मोठी राजकीय घडामोड : सुरेशदादा जैन आणि संजय राऊतांची 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा


Big political development : Sureshdada Jain and Sanjay Raut hold 15-minute closed-door discussion जळगाव (31 मे 2025) : जळगाव जिल्हा दौर्‍यावर आलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश जैन यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना ऊत आला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. संजय राऊत हे शुक्रवारी रात्री मुंबईहून विमानाने जळगावी दाखल झाले. त्याचवेळी विमानतळावरील प्रतीक्षा कक्षात आधीच थांबून असलेले माजी मंत्री सुरेश जैन आणि त्यांची औपचारीक भेट झाली.


भेटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. राजकीय अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आता आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी जळगावत आलेल्या संजय राऊतांची भेट झाल्यामुळे व बंदद्वार चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वर्तवले जात आहेत.

एकेकाळी शिवसेनेचे नेते आणि मंत्री असलेले जैन भेटल्यानंतर राऊत यांनी त्यांची आस्थेवाईक चौकशी केली. सुरेश जैन आमचे जुने नेते आणि मार्गदर्शक आहेत. ते अजून थकलेले नाहीत, असे राऊत म्हणाले. आमच्या दोघांमधील आगामी निवडणुकांच्या चर्चेबाबत तुम्हाला लवकरच कळेल, असे विरोधकांना कोड्यात टाकणारे वक्तव्य राऊत यांनी केले.

संजय राऊत आमचे जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. राजकीय विषयावर कोणतीच चर्चा आमच्यात झाली नाही. राजकारणातही मी पुन्हा सक्रीय होणार नसल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री जैन यांनी दिली. याप्रसंगी ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित होते.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !