नाशिक परिक्षेत्रातील 12 पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्या


Request for transfer of 12 police inspectors in Nashik area भुसावळ (31 मे 2025) : नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रातील 12 पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्या केल्या आहेत.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 22 न (2) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांनी या बदल्यांना मान्यता दिली आहे.


या आदेशानुसार, नाशिक परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांतील पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या.

दरम्यान, 42 पोलिस उपनिरीक्षकांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आल्या तर 35 पोलिस उपनिरीक्षकांच्या विनंती बदल्या तसेच 11 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
हेमंतकुमार भामरे (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार)
अरुण काशिनाथ धनवडे (नाशिक ग्रामीण ते अहिल्यानगर)
यशवंत भाऊराव बाविस्कर (अहिल्यानगर ते नाशिक ग्रामीण)
प्रदीप बाळासाहेब देशमुख (अहिल्यानगर ते जळगाव)
भगवान हरिभाऊ मथुरे (अहिल्यानगर ते नाशिक ग्रामीण)
समाधान चंद्रभान नागरे (अहिल्यानगर ते नाशिक ग्रामीण)
नागेश एन.मोहिते (जळगाव ते नाशिक ग्रामीण)
किरणकुमार दशरथ कबाडी (जळगाव ते अहिल्यानगर)
सारिका विठ्ठलराव अहिरराव (धुळे ते नाशिक ग्रामीण)
शशिकांत श्रीराम पाटील (धुळे ते जळगाव)
संदीप उत्तमराव पाटील (नंदुरबार ते जळगाव)
जगदीश छबुराव भांबळ (नंदुरबार ते अहिल्यानगर)

बदली झालेल्या निरीक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. बदली ठिकाणी वेळेत हजर न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !