पाझर तलावात बुडून चार अल्पवयीनांचा मृत्यू

Four minors die after drowning in Pazar pond चाकण (31 मे 2025) : चाकणजवळील कडाचीवाडी (ता.खेड ) गावच्या हद्दीतील पाझर तलावात बुडाल्याने चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवार, 31 मे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. हृदय हेलावून टाकणार्या या घटनेने चाकण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओमकार बाबासाहेब हंगे (13, सध्या रा.मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा.हंगेवाडी, ता.केज, जि.बीड), श्लोक जगदीश मानकर (13, सध्या रा.मेदनकरवाडी, मूळ रा.धनवडी, ता.वरुड, जि.अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (13, सध्या रा.मेदनकरवाडी, मूळ रा.अंबुलगा, ता.मुखेड, जि.नांदेड), नैतीक गोपाल मोरे (13, सध्या रा.मेदनकरवाडी, मूळ रा.बुलढाणा, झरी बाजार, ता.अकोट, जि.अकोला) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

चौघे अल्पवयीन मुले शनिवारी राहत्या घरातून सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले होते. चाकणजवळील कडाचीवाडी गावच्या हद्दीतील पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना दमछाक होऊन या सर्वांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारपर्यंत हे चौघे जण घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. पाझर तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे मिळून आल्या. स्थानिक नागरिकांसह आपदा मित्रांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
