भुसावळात जुगाराचा डाव उधळला : सात जुगारी जाळ्यात
भुसावळ : शहरातील द्वारकानगर भागात जुगाराचा डाव रंगात आला असताना शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता छापा टाकत सात जुगार्यांना अटक केली तसेच 15 हजार 650 रुपये रोख जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी नागसेन वामन गायकवाड (रा.पीओएच कॉलनी, कंडारी), मजिंद खान इद्रीस खान (रा. द्वारकानगर, भुसावळ), महेश मोतीलाल परदेशी (रा. कंडारी), रजिमखान इस्लाम खान (रा. द्वारकानगर, भुसावळ), इसाक अली उर्फ हिरो अब्बास अली (रा. अकबर टॉकीजजवळ, भुसावळ), जितेंद्र पुरण सकत (रा. रेल्वे क्वॉर्टर, भुसावळ) व जावेद अली मुस्ताक अली (रा. द्वारकानगर, भुसावळ) यांना पोलिसांनी अटक करण्यात आली. हालदार संजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून नंतर आरोपींची जामिनावर सुटका झाली. ही कारवाई शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही.डी.पेटकर, संजय पाटील, सोपान पाटील, जुबेर शेख, ईस्माईल खाटीक, किशोर इंगळे, मोहन पाटील आदींच्या पथकाने केली.