20 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात
Constable caught while taking bribe of Rs 20,000 अंबड (1 जून 2025) : फसवणुकीची तक्रार वरिष्ठांचा प्रभाव दाखवून निकाली काढण्यासाठी 20 हजारांची लाच मागणार्या नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यातील हवालदाराला नाशिक एसीबीने अटक केली आहे.हवालदार उमाकांत रंगनाथ टिळेकर (39) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांचा चॉकलेट-बिस्कीटचा व्यवसाय आहे. अंबड पोलिसात त्यांच्या विरोधात फसवणूक केल्या प्रकरणात तक्रार अर्ज दाखल आहे. तक्रारी अर्जात गुन्हा न दाखल करण्यासाठी व हा अर्ज निकाली काढण्यासाठी पोलीस हवालदार टिळेकर यांनी 31 मे रोजी सायंकाळी पाच वाजता अंबड पोलीस स्टेशनला 20 हजार रुपये घेवून बोलावल्याची तक्रार तक्रारदाराने दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपी हवालदाराने स्वतःसह साहेबांच्या नावाचा प्रभाव टाकून लाच मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने अंबड पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर हवालदाराला अटक करण्यात आली. हवालदाराचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला तर पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, नाईक विनोद चौधरी, कॉन्स्टेबल अनिल गांगोडे आदींच्या पथकाने केली.