भुसावळातील देशमुख दाम्पत्याचा पुढाकार : बांंधकाम कामगार योजनेंतर्गत मोफत भांड्यांचा सेट मिळण्यासाठी नोंदणीला सुरूवात
भुसावळ (1 जून 2025) :बांधकाम कामगार योजनेंतर्गत लाभार्थींना शासनाकडून भांड्यांचा सेट दिला जाणार आहे. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 मधील समाजसेवक रुपेश देशमुख व डॉ.छाया फालक (देशमुख) यांनी पुढाकार घेऊन प्रभागात मोफत नोंदणी अभियान राबवले. याप्रसंगी तब्बल 230 नागरिकांनी यासाठी नोंदणी केली.
या शिबिरासाठी हेमंत सोनवणे, नरेंद्र अहिरकर, गोरक्ष वाडे, पल्लवी वाघोदे, रोहिणी पाटील, कविता ठाकूरआदींनी सहकार्य केले.
- योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- सरकारतर्फे बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा संच मोफत देण्यात येणार आहे
- योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने फक्त एक रुपयात भरता येईल
- नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या घरपोच भांडी मिळतील
- योजना फक्त सात दिवसांसाठी सुरू असेल, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरणे महत्त्वाचे आहे
भांड्यांची यादी
जेवणाचे ताट – 4 नग
वाट्या – 8 नग
पाण्याचे ग्लास – 4 नग
पतेले झाकणासह – 2 नग (वेगवेगळ्या आकारांचे)
भात वाढण्याचा मोठा चमचा – 1 नग
वरण वाढण्याचा मोठा चमचा – 1 नग
पाण्याचा जग (2 लिटर क्षमतेचा) – 1 नग
मसाला डब्बा (7 भागांमध्ये विभागलेला) – 1 नग
स्टोरेज डब्बे झाकणासह – 3 नग (14 इंची, 16 इंची, आणि 18 इंची)
परात – 1 नग
फ्रेश कूलर (5 लिटर क्षमतेचा, स्टीलचा) – 1 नग
कढई (स्टीलची) – 1 नग
स्टीलची टाकी झाकणासह (मोठी) – 1 नग
या सर्व भांड्यांची गुणवत्ता उत्तम असून, दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. विशेष म्हणजे, सर्व भांडी स्टीलची आहेत, ज्यामुळे त्यांचा दीर्घकाळ वापर करता येईल.
योजनेचे पात्रता निकष
अर्जदार बांधकाम क्षेत्रात काम करणारा कामगार असावा
अर्जदाराने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असावी किंवा नव्याने नोंदणी करण्यास तयार असावा
कामगाराने किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा