बहिणाबाई विद्यापीठात सावरकर अभ्यास संशोधन केंद्र सुरू करा : शिशिर जावळे यांची मागणी
राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले पत्र
Start a Savarkar Studies Research Center at Bahinabai University : Shishir Javale’s demand भुसावळ (1 जून 2025) : जळगावातील बहिणाबाई विद्यापीठात सावरकर अभ्यास संशोधन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
विद्यापीठात व्हावी संशोधन केंद्राची स्थापना
स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर विद्वान, पुरोगामी, विचारवंत, इतिहासकार, समाज सुधारक व अग्रगण्य समाज सुधारक होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेला पाप आणि माणुसकीला कलंक मानले. ते रूढीवादाच्या विरोधात उभे राहिले आणि दलितांना मंदिरात प्रवेशासाठी त्यांनी लढा दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांच्या कार्याचे आणि वचन पद्धतीचे कौतुक केले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि येणार्या सर्व पिढ्यांना स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर सावरकरांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी त्यांनी केलेला त्याग, समर्पण आदी त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दलची माहिती, इतिहास सर्वांना ज्ञात व्हावा आणि त्यांच्या या कार्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठाप्रमाणे उत्तर महाराष्ट्र कवयित्री बहिणाबाई विद्यापीठात सुद्धा त्वरित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिष्य दिनकर जावळे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.