अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी : मंत्री संजय सावकारे
भुसावळात त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपने राबविले विविध उपक्रम
Ahilyadevi Holkar’s work is inspiring: Minister Sanjay Savkare भुसावळ (2 जून 2025) : पुण्यश्लोक अहिल्यादेवींमुळेच आज देशात काशी विश्वेश्वर मंदिर पाहण्यास मिळत असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी आपल्या कारकिर्दीत देशभरात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, असे विचार वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. ते म्हणाले की, अहिल्यादेवींनी विविध सामाजिक सुधारणा करून सतीसारख्या प्रथेला विरोध केला. सातबाराची संकल्पना ही त्यांनीच रुजू केली. त्यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असेही ते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भुसावळात भाजपने राबविलेल्या उपक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भुसावळ शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात महिला मेळावा तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी जागर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष किरण कोलते व संदीप सुरवाडे, महिला मोर्चा अध्यक्ष अनिता आंबेकर, माजी शहराध्यक्ष युवराज लोणारी, प्रदेश सचिव अजय भोळे, परीक्षीत बर्हाटे यांची विशेष उपस्थिती होती.
महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा
मेळाव्यात महिलांकरिता अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध स्पर्धांमध्ये विजेत्या स्पधर्र्कांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी जागर मॅरेथॉन
मेळावा झाल्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जळगाव रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवी स्मारक ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापर्यंत शेकडो महिलांनी जागर मॅरेथॉनमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. जागर मॅरेथॉनला कॅबिनेट मंत्री सावकारे यांनी हिरवा झेंडा दाखविला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास माजी नगरसेविका मीना लोणारी, प्रीती पाटील, अनिता सपकाळे, दीपाली बर्हाटे, प्रीती कोलते, पल्लवी वारके, वैशाली सैतवाल, प्रतिभा बोचरे, रेखा धूपे, वंदना सोनार, अरुणा पाटील आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वर्षा लोखंडे यांनी केले.