माजी मंत्री खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप : भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून सात वर्ष तुरुंगात डांबले


Former minister Khadse makes serious allegations against Girish Mahajan: nephew was framed in a false case and sent to jail for seven years जळगाव (3 जून 2025) : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी थेट मंत्री गिरीश महाजनांवर खळबळजनक आरोप केला आहे. माझ्या सख्ख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले व त्याने विनाकारण तब्बल सात वर्षं तुरुंगात घालवली, असे खडसे म्हणाले आहेत.

आमदार खडसे म्हणाले की, माझ्या भाच्याला गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरूनच अडचणीत आणण्यात आले. त्याच्यावर खोटे खटले लावले गेले. सत्य समोर आले तेव्हा तो निर्दोष सुटून आला. पण त्या सात वर्षांत त्याने अतिशय हालअपेष्टा सहन केल्या. कारागृहातील हालचाल आणि तेथील कैद्यांना मिळणार्‍या अन्नाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे त्याने सांगितले.

कारागृह साहित्य पुरवठा प्रकरणात घोटाळा झाला असून, त्यामागे जळगावातील एका मंत्र्याचा हात आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला होता. त्यासंदर्भात बोलताना खडसे म्हणाले, या आरोपांची सखोल माहिती घेतली जात आहे. लवकरच या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवणार असून, चौकशीची मागणीही केली जाईल.

एकनाथ खडसे म्हणाले की, पालकमंत्री पद ही काही हक्काची जागा नाही. त्यासाठी लोचटपणा, लाचारी करण्याची गरज काय? नाशिकमध्ये चार मंत्री असताना बाहेरचा मंत्री पालकमंत्री व्हावा यासाठी आटापिटा करतोय. हे सगळे हजारो कोटींच्या कुंभमेळा बजेटमधून मलिदा मिळवण्यासाठी सुरू आहे, असा घणाघात करत खडसे यांनी केला. नाशिकच्या पालकमंत्री पदावरूनही खडसे यांनी नाव न घेता महाजनांवर जोरदार टोला लगावला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !