संजय राऊतांच्या दलालीमुळे उद्धव ठाकरेंची सेना संपली : मंत्री गिरीश महाजन


Uddhav Thackeray’s army ended due to Sanjay Raut’s mediation: Minister Girish Mahajan नाशिक (3 जून 2025) : खासदार संजय राऊत करीत असलेल्या दलालीमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली, अशा कणखर शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांचा समाचार घेतला. जर आता उद्धव ठाकरेंनी त्यांना आवरले नाही तर त्यांच्याकडे कुणीही राहणार नाही. शिवसेना जमीनदोस्त होईल, असेही ते म्हणाले.

गिरीश महाजन म्हणाले की, मी पक्षासाठी काय केले हे लोकांना माहिती आहे. गेली 35 वर्षे मी निवडून येत आहे. पक्षासाठी मी काहीही करेल. पण ते केवळ पक्षाच्या वाढीसाठी असेल. तुमच्यासारखे पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही. पत्राचाळ प्रकरणी आपण काय केले? किती दिवस जेलमध्ये राहिलात हे मला बोलायला लावू नका. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवले.

राऊतांनी उद्धव ठाकरेंना संपवले
ाऊत तुम्ही सर्व शिवसेना संपवली तुम्ही काय बडबड करता. अजूनही तुमची बडबड बंद झाली नाही तर उद्धवजी देवच तुमचे भले करो. संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती, उद्धव ठाकरेंना संपवायचे होते म्हणून त्यांनी इतकी मेहनत घेतली आणि पवारांच्या दावणीला जाऊन शिवसेना बांधली.

संजय राऊत सारखा माणूस पक्षात असताना उद्धव ठाकरेंना शत्रूची गरजच नाही. तेच पक्ष फोडण्याचे काम करत आहे.

खडसेंची मानसिक स्थिती खराब
गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या हातात आता काही राहिलेले नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झाली आहे. त्यांना कुणी निवडून देत नाही. ते माझ्यावर करीत असलेल्या बेछूट आरोपांमुळे त्यांचे डोकं तपासायची गरज आहे. भोसरीच्या केसमध्ये काय झाले हे सर्वांना माहिती आहे. मी एकदा दिल्लीला जाऊन येतो, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !