भुसावळ शहर व तालुक्यातील शेकडो पदाधिकार्‍यांचा शिंदे गटात प्रवेश

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधीत झाला प्रवेश सोहळा


भुसावळ (4 जून 2025) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भुसावळ येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कोळी समाजाचे युवा नेतृत्व दीपक सोनवणे व बबलू सोनवणे यांच्यासह शेकडो तरुणांनी पाळधी येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पालकमंत्री पाटील यांनी पदाधिकार्‍यांचे यावेळी पक्षात स्वागत केले. प्रसंगी भुसावळचे दीपक धांडे, पप्पू भैय्या बारसे, बबलू बर्‍हाटे, रोहित वराडे, योगेश वाघ उपस्थित होते.

यांनी केला शिंदेच्या सेनेत प्रवेश
मनोज सोनवणे, आकाश सोनवणे, वैभव सोनवणे, बबलू सोनवणे, बारक्या भोई, विनायक माळी, पिंटू पळधीकर, रवी पवार, राहुल बेंद्रे, पिंटू अग्रवाल, यतीन कोर्‍हाळकर, गपू महाजन, भूषण सपकाळे, सचिन सोनवणे, भावेश सोनवणे, प्रशांत सोनवणे, मुकेश भोई, किरण दराडे, पिंक्या मोरे, संतोष भोई, सतीश सपकाळे, नितीन सोनवणे, अशपाक खाटीक, आरीफ शेख यांच्यासह 44 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !